पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २६

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २६

Published on

प्रभाग २६ ः कस्पटे वस्ती- पिंपळे निलख- विशालनगर

राजकीय पक्षांपेक्षा
शाश्वत विकासाकडे लक्ष

- बेलाजी पात्रे
रा हण्यासाठी उत्तम परिसर म्हणून सर्वाधिक पसंती असल्याने पिंपळे निलख, विशालनगर आणि कस्पटे वस्ती, पार्क स्ट्रीट परिसरातील मतदारसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. नव्या मतदारांचा कल सध्याचा विकास, भविष्यातील शाश्वत विकासाची हमी, स्थानिक समस्या सोडविणे, प्रदूषण नियंत्रण आणि पायाभूत सुविधांवरील भर याकडे आहे. आयटी कर्मचाऱ्यांच्या वाढत्या वसाहती, नव्या हाउसिंग सोसायट्या, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक, उद्योजकांची रेलचेल आणि औद्योगिक पट्टा समाविष्ट आहे.

समाविष्ट भाग
पिंपळे निलख गावठाण, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर परिसर, अण्णा भाऊ साठेनगर, वेणुनगर भाग, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड परिसर, वाकड सीमा भाग आदी.

पक्षीय स्थिती
- राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवार निवडीच्या स्पर्धेचा भाजपला फायदा मिळणे शक्य
- भाजपकडून डावललेल्या नाराजांचा गट ऐनवेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही
- शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

दृष्टीक्षेपात....
- नवख्या उमेदवारांची चार वर्षांपासूनची तयारी
- पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पाणी हा प्रमुख मुद्दा
- नवमतदार ठरवतील प्रभागाचा निकाल

प्रचारातील संभाव्य मुद्दे
- टॅंकर मुक्त परिसर, रस्ते, मुबलक पाणी
- कचरा व्यवस्थापन, प्रदूषण समस्या, वाहतूक कोंडी
- सांडपाणी, सुरळीत वीजपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com