

हिंजवडी, ता. २९ : दिवाळी आठवड्याभराच्या सुट्टीनंतर सोमवारपासून (ता. २७) हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो आयटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. त्यामुळे या परिसरात पुन्हा वर्दळ वाढली आहे. दरम्यान, सुट्ट्यांच्या काळात वाहतुकीचा ताण कमी झाल्यने वाकड-हिंजवडी पोलिसांनी बेलगाम एक हजार ८१४ अवजड वाहनांवर तब्बल २३ लाख २१ हजार ५०० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बहुतेक आयटी कंपन्यांनी आठवड्याभराची सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार, बहुतेक कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून कामावर हजेरी लावली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील ५० हून अधिक कंपन्यांमध्ये सुमारे चार लाख कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी २ लाखांहून अधिक दररोज या परिसरात ये-जा करतात.
दरम्यान, सुट्टीनंतर वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तीव्र कारवाईवर भर दिला आहे. यात गंभीर अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या अवजड वाहनांकडे लक्ष ठेवले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्त्यांची अवस्था मात्र दयनीय
कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या काळात आयटीतील रस्त्यांवर कमालीची शांतता होती. वाहनाची वर्दळही नव्हती. या काळात पीएमआरडीए, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी व महापालिका प्रशासनाने किमान रस्त्यांची तात्पुरजी डागडुजी करणे आवश्यक होते. तसे झाल्यास कंपन्या सुरू झाल्यावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असती. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव, चालढकलपणा आणि एकमेकांकडे बोट दाखवण्याची वृत्ती यामुळे आयटीतील समस्यांचे गुऱ्हाळ वर्षानुवर्षे कायम आहे.
सुट्टीचा फायदा घेत आम्ही वाहतूक व्यवस्थित अनेक बदल केले आहेत. आवश्यकतेनुसार पोर्टेबल सिग्नल सुरू केले. काही ठिकाणी जाताना आणि येताना लेन कमी-जास्त केल्या. थांबे हलवले, बंद सिग्नल सुरू केल. मात्र, रस्त्यांची डागडुजी करण्याबाबत संबंधित विभागाला वारंवार पत्रकार करून त्यांच्याकडून कुठल्याही ठोस
उपयोजना झाल्या नाहीत.
- राहुल सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी
अवजड वाहने कमी करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. दिवाळी सुट्ट्यांमध्ये अवजड वाहनांना शिस्त लावण्याचे काम केले आहे. धडक कारवाई करून लाखो रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल केला आहे. आरएमसी प्लांट व बांधकाम प्रकल्पांना देखील नोटीस बजावली. त्यामुळे या भागातील अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड कमी झाली आहे.
- मधुकर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक, वाकड
वाकड वाहतूक विभागाची कारवाई
बीएनएस २८५ : ५ वाहने, ४ गुन्हे
नो इंट्री : ७०३ वाहनांकडून ९ लाख ४० हजार ५०० दंड
आरएमसी प्लांट : २२ नोटीस
बांधकाम प्रकल्प : ३५ नोटीस
हिंजवडी वाहतूक विभाग
बीएनएस : ७६ वाहने, ४२ गुन्हे
नो इंट्री : १०३० वाहने, १३ लाख ८१हजार दंड
आरएमसी प्लांट : ५ नोटीस
बांधकाम प्रकल्प : १ नोटीस
WKD25A09740
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.