दिव्यांगांच्या रोजगारासाठी 
कौशल्य विकास आवश्यक

दिव्यांगांच्या रोजगारासाठी कौशल्य विकास आवश्यक

Published on

वाकड, ता. १७ : ‘‘भारतातील दिव्यांगांच्या रोजगाराच्या संधीचा विचार केला तर केवळ २३ टक्के दिव्यांगांना रोजगार उपलब्ध आहेत. उर्वरित ७७ टक्के दिव्यांग बेरोजगार आहेत. कारण दिव्यांगांमध्ये शारीरिक मर्यादे बरोबरच वय, शिक्षण तसेच कौशल्य विकासाचा अभाव असतो. दिव्यांगांचा रोजगाराभिमुख कौशल्य विकास, सहाय्यभूत साधनांची उपलब्धता आणि एम्प्लॉयर अवेअरनेसच्या माध्यमातून ही परिस्थिती बदलता येईल. यासाठी जागृती केली पाहिजे,’’ असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज संस्थेचे अध्यक्ष नीलेश छडवेलकर यांनी व्यक्त केले.
दिव्यांग स्वाभिमान संस्थेच्या वतीने मोरवाडी पिंपरी येथील दिव्यांग भवन फाउंडेशन येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी रा. स्व. संघाच्या पिंपरी-चिंचवड विभागाचे सेवा विभाग प्रमुख सचिन बालवाडे, दिव्यांग स्वाभिमान संस्थेचे अध्यक्ष गहिनीनाथ नलवडे, उपाध्यक्ष किशोर रासकर, सचिव विजय पगडे, खजिनदार अमोल देशमुख, कार्यालय प्रमुख संतोष इंदलकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स्वतः दिव्यांग असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी अनेक वर्ष कार्यरत दत्तात्रेय लखे यांना दिव्यांग स्वाभिमान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुनील पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, अण्णा खेसे, राजेंद्र बेंद्रे, शिवशंकर मुंडे, हरिदास शिंदे, अशोक सोनवणे, नाना डाडर, धीरेंद्र देसले, नीलेश बागूल, सचिन वाघमारे, दीपक हरपळे, दीपक जगताप, रवींद्र मोरे, अमोल शिनगारे, अर्चना घुंडरे, मयूरी बोत्रे यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष किशोर रासकर यांनी तयार केलेल्या वेबसाइटचे उद्‍घाटन करण्यात आले. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित गायन आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. याचबरोबर दिव्यांगांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com