मंगळवारी अजित पवार यांना थेरगावात श्रद्धांजली

मंगळवारी अजित पवार यांना थेरगावात श्रद्धांजली

Published on

वाकड, ता. १ ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व थेरगाव ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी (ता. ३) सायंकाळी सहा वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. सर्व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समस्त थेरगाव ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ही शोकसभा थेरगावातील संतोषनगर येथील संतोष मंगल कार्यालयात होणार आहे. पवार यांनी थेरगावच्या विकासासाठी दिलेले योगदान, त्यांची सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि माणुसकीचा वारसा या शोकसभेतून अधोरेखित केला जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com