जिल्हा परिषद-पंचायत समिती प्रचाराच्या तोफा थंडावल्या
हिंजवडी, ता. ५ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला अखेर गुरुवारी (ता. ५) रात्री पूर्णविराम मिळाला असून, हिंजवडी-माण गट आणि गणात उमेदवारांच्या सांगता सभा, पदयात्रा व फेऱ्यांनी प्रचाराचा शेवट गाजत-वाजत झाला. गेली आठ दिवस सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अन प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी गाठीभेटींनी परिसर पिंजून काढला. हिंजवडी-माण गण आणि गटातील भाजप उमेदवारांनी दुपारी तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पदयात्रा काढली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवाजी चौकांतून निघालेल्या फेरीची गावठाणातील हनुमान मंदिरात सभेने सांगता झाली. त्यात उमेदवारांनी विकासाचा लेखाजोखा मांडत मतदारांना शेवटचे आवाहन केले. रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, आरोग्य तसेच आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. प्रचाराची सांगता होताच उमेदवारांचे लक्ष आता मतदानाकडे केंद्रित झाले आहे. कोणाच्या शब्दांवर जनता शिक्कामोर्तब करणार ? आणि कोणाकडे जनतेचा कल राहणार ? याची उत्सुकता सर्वत्र असून, हिंजवडी-माण गट व गणातील लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

