वाकड, पिंपळे निलखमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

वाकड, पिंपळे निलखमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

Published on

वाकड, ता. १९ : वाकड, कस्पटे वस्ती, विशालनगर आणि पिंपळे निलख परिसरात प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत गंभीर त्रुटी निर्माण झाल्याचा मुद्दा निदर्शनास आणून देत नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी याबाबत महापौर रवी लांडगे यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य विभाग, साफसफाई कर्मचारी, कंत्राटदार संस्था आणि कचरा संकलन यंत्रणा यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी कचरा साचत आहे. पदपथ, मोकळ्या जागा तसेच रस्त्यांच्या कडेला कचरा टाकला जात असून त्यातून दुर्गंधी व अस्वच्छता वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. प्रभागात रात्रीच्यावेळी झाडू मारणे, साफसफाईची कामे केली जात असली तरी त्यावर प्रभावी पर्यवेक्षण नसल्याने कामाची गुणवत्ता समाधानकारक नाही. त्यामुळे रात्रीऐवजी दिवसाच्या वेळेत हाताने तसेच यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यात यावी, जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रभावी निरीक्षण होईल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चिंचवडचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रभाग स्वच्छ, सर्वांग सुंदर आणि आदर्श करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आम्ही सकारात्मक पावले टाकत आहोत. लवकरच साफसफाई स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.
- स्नेहा कलाटे, नगरसेविका, वाकड-पिंपळे निलख

WKD26A10508

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com