वादविवाद स्पर्धेमध्ये मेहेक आगा विजेती

वादविवाद स्पर्धेमध्ये मेहेक आगा विजेती

Published on

वाकड, ता.२४ : इंदिरा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि स्कूल ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स यांच्या संयुक्त विद्यमानाने ताथवडे येथे आयोजित राज्यस्तरीय शंकरराव वाकलकर आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत हिंदुस्थान एरोस्पेस महाविद्यालयाची मेहेक आगा हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
उद्‍घाटनप्रसंगी गोखले इन्स्टिट्यूटचे डॉ. संकल्प गुर्जर, इंदिरा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अनघा जोशी, अधिष्ठाता डॉ. दयानंद कन्नूर आदी उपस्थित होते.
डॉ. पूनम भोईर, डॉ. जनार्दन पवार, संयोजक डॉ. नालंदा वाणी, प्रा. सारिका ठाकरे, प्रा. विजय मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. स्कूल ऑफ बिझनेस, इंदिरा विद्यापीठाचा कुणाल कवारके द्वितीय स्थानी तर स्कूल ऑफ फायनान्स, एमआयटी विद्यापीठाचा ओजल गोळे तृतीय स्थानी राहिला. वाडिया कॉलेजचा आशुतोष सिंग यास उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. एमआयटी आर्ट डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या नितीशा चापेकर, प्राची सिंग यांना उत्कृष्ट संघाचे पारितोषिक देण्यात आले. अधिष्ठाता डॉ.अंजली काळकर यांनी स्वागत केले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. तरीता शंकर यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले.
WKD26A10525

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com