रोज ॲस्टर सोसायटीत शिवजयंती उत्साहात

रोज ॲस्टर सोसायटीत शिवजयंती उत्साहात

Published on

हिंजवडी, ता. २१ : पुनावळेतील गायकवाडनगर येथील रोज ॲस्टर सोसायटीत यंदाही शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले. मिरवणुकीनंतर उत्सव समितीचे सदस्य आणि महिलांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महिलांनी शिवरायांचा पाळणा गायला आणि त्यानंतर लहानग्यांनी व महिलांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर केले. यात प्रामुख्याने अफजलखानाचा वध ही छोटीशी नाटिका, महिलांचे लेझीम, लाठी-काठी, छत्रपतींचा पोवाडा इत्यादीचा समावेश होता. मिठाई वाटपाने सांगता झाली.

WKD26A10549

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com