एमआयडीसी कर्मचाऱ्यांना अखेर हक्काचे घर

एमआयडीसी कर्मचाऱ्यांना अखेर हक्काचे घर

Published on

वाकड, ता. २३ : राज्य औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर १५ वर्षांनी साकार झाले. बिजलीनगर येथील साईदत्त सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून तब्बल २६५ सभासदांना स्वतःच्या घराची किल्ली मिळाली.
राज्याचे उद्योगमंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या गृहप्रकल्पाचे शुक्रवारी (ता. २२) उद्‍घाटन झाले. याप्रसंगी मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, बाळासाहेब झांजे, अधीक्षक अभियंता नीलेश मोंढवे, राहुल तिडके, कार्यकारी अभियंता विनायक खांदवे, संजय कितवाड, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक विश्वजीत बारणे, नीलेश तरस, राजेंद्र गावडे, साईदत्त सोसायटीचे अध्यक्ष शैलेंद्र परदेशी, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, डॉ. अर्चना पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्मचारी वसाहतीसाठी चिंचवड येथे जागा मिळावी या उद्देशाने संस्थेने २०१० मध्ये एमआयडीसीकडे अर्ज केला होता. जागा मंजूर झाल्यानंतर शैलेंद्र परदेशी यांची सर्वानुमते प्रवर्तक म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर २५ महिन्यांत सहा भव्य इमारती उभारून बांधकाम पूर्ण करण्यात आले.

गृहनिर्माण संस्था केवळ निवासस्थानांची उभारणी नसून, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि सुसंस्कृत निवासव्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.
- शैलेंद्र परदेशी, अध्यक्ष, साईदत्त सोसायटी


कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
एमआयडीसीचा प्रत्येक कर्मचारी आणि देशाच्या आर्थिक वाढीला गती देणारा उद्योजक या दोघांच्या श्रमांवरच विकासाचा पाया उभा आहे. त्यामुळे त्यांच्या कामात कुठलाही अडथळा, विलंब किंवा अकारण अडचण निर्माण होऊ देऊ नका, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले.

WKD26A10565

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com