ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नितीन देसाई यांना आदरांजली
हिंजवडी, ता. २४ : दिवंगत उद्योजक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नितीन देसाई यांना माणमधील महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्रात माजी दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. तसेच शिक्षण आणि पुनर्वसन क्षेत्रातील त्यांचे महत्वपूर्ण योगदान अधोरेखित केले.
वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी वरील केंद्रात देसाई यांच्या शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेसाठी महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्राचे मुख्याध्यापक गणेश जगताप, शरद फलके, रमेश जाधव, तुषार देशमुख, विजय पगडे, हरिदास शिंदे, शिवाजी भेगडे, धीरेंद्र देसले हे माजी विद्यार्थी तसेच महात्मा फुले प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.
पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या माध्यमातून रामटकडी, हडपसर येथे सुरू असलेल्या तांत्रिक प्रशिक्षण संस्थेत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील दृष्टिहीन तरुणांच्या पुनर्वसनासाठी नितीन देसाई यांचे असलेले योगदान तसेच पुण्यातील सिंहगड रस्त्यावर धायरीतील वृद्धाश्रम आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाद्वारे अनेक गरजू रुग्णांना विनामूल्य नेत्रशस्त्रक्रियांची सुविधा देत दृष्टी देण्याच्या देसाई यांच्या कामाची तुषार देशमुख यांनी प्रशंसा केली. तसेच देसाई यांच्या अस्थिव्यंग दिव्यांगासोबतच अंधांसाठी केलेल्या कार्याची त्यांनी माहिती दिली. देसाई यांच्या कार्यकाळात संस्थेत मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची इमारत उभी राहिल्याचे हरिदास शिंदे यांनी सांगितले. तर संस्थेने आम्हाला स्वावलंबी जीवन जगण्याचे संस्कार दिल्याचे गणेश जगताप यांनी नमूद केले.
दिवंगत रघुनाथ गोविंद तथा आर.जी. काकडे यांनी १९५६ मध्ये स्थापन केलेल्या दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्थेच्या नव्वदच्या दशकात काही काळ नितीन देसाई यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
WKD26A10570
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

