थेरगावमधील शाळेत शिक्षकांचा सन्मान
वाकड, ता. २५ : थेरगावमधील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेत शिक्षक कृतज्ञता समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. विविध शैक्षणिक उपक्रमात सहभागी झालेल्या ‘ग’ प्रभागातील अठरा शाळांमधील शिक्षकांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लेखक श्रीकांत चौगुले, अशोक कुलकर्णी, महापालिकेच्या सीएसआर विभागाच्या तज्ज्ञ श्रुतिका मुंगी, सचिन बोधनी, मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते. समाजात शिक्षकाचे स्थान नेहमी आदराचेच असते. अनेक शिक्षक चौकटीच्याबाहेर जाऊन मुलांसाठी काम करत करतात. विविध उपक्रम राबवत असतात, अशा शिक्षकांची दखल समाजानेही घेतली पाहिजे, अशी अपेक्षा चौगुले यांनी व्यक्त केली.
मुंगी यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत सीएसआर विभागाच्या कार्याची माहिती दिली. संतोष जंगम, भारती वर्णे, राजेश भेलावे यांनी संयोजन केले. राधिका भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता तिकोने यांनी आभार मानले.
WKD26A10577
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

