इंदिरा विद्यापीठाचे विद्यार्थी दुबईहून सुखरूप मायदेशी
वाकड, ता. ३ : दुबईला शैक्षणिक दौऱ्यासाठी गेलेले ताथवडेतील इंदिरा विद्यापिठाचे ८४ विद्यार्थी विशेष विमानाने सुखरूप मायदेशी परतले. विद्यापीठाच्या प्रमुख मार्गदर्शिका व अध्यक्षा डॉ. तरिता शंकर यांनी ४८ तास केलेले अथक प्रयत्न यशस्वी ठरले. त्यामुळे मुलांच्या पालकांचाही जीव भांड्यात पडला.
एका बाजूला दुबईतील विद्यार्थ्यांना धीर देणे, दुसऱ्या बाजूला पालकांना आश्वस्त ठेवताना डॉ. तरिता यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय अशा सर्व पातळ्यांवर संपर्क साधला. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सात वाजता विशेष विमानाने उड्डाण केले. त्यानंतर मुंबई विमानतळावर विद्यार्थी उतरले तेव्हा पालक भावविवश झाले.
शिक्षणसंस्थेची जबाबदारी, माध्यमांचा पाठपुरावा आणि शासनाची संवेदनशीलता अशा तीन पातळ्यांवर समन्वय जुळून आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयातून दुबईत तत्काळ संपर्क साधण्यात आला. दुबईतील महाराष्ट्र मंडळाचे सोमनाथ पाटील विद्यार्थ्यांच्या हॉटेलवर गेले. त्यांनी व्हिडिओ कॉल केला. उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत धीर दिला. त्यानंतर २४ तासांत विशेष विमानाची व्यवस्था झाली. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि अमिराती प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला.
---
मी इतक्या वर्षांत प्रथमच होळी साजरी केली नाही. माझ्या मुलांनी घेऊन विशेष विमानाने दुबईहून सुरक्षित उड्डाण केल्याची बातमी मिळाल्यावरच मी पुरणपोळीचा घास घेतला. त्याआधीचा सारा घटनाक्रम सांगताना माझ्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटले आहे. ही सगळी मुले माझीच आहेत. त्यांना सुरक्षित मायदेशी आणणे हेच दोन दिवसांतील एकमेव ध्येय होते.
- डॉ. तरिता शंकर, अध्यक्षा तथा प्रमुख मार्गदर्शिका, इंदिरा विद्यापीठ
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

