‘उमंग २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
वाकड, ता. ६ : कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग २०२६’ नटसम्राट निळू फुले सभागृहात उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार, सुरेल गायन आणि नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली. रंगतदार सादरीकरणांमुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात बक्षीस वितरण समारंभ झाला.
या सोहळ्यासाठी साई सकल प्रसारक मंडळाचे संचालक ज्ञानेश्वर दळवी व सचिव आरती दळवी या प्रमुख मान्यवरांसह प्राचार्य डॉ. महेश देशपांडे, डॉ. भाग्यश्री दुधाडे, डॉ. ज्योती शिंदे, लक्ष्मण क्षीरसागर व रजिस्ट्रार अशोक कुंभार उपस्थित होते. मागील वर्षातील शैक्षणिक गुणवंत, विविध ‘डेज सेलिब्रेशन’ स्पर्धांचे विजेते, क्रीडा स्पर्धांतील व उपविजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. प्रकाश यादव, गिरीश कारडिकर व डॉ. देवेन सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी ‘मराठी गौरव दिना’निमित्त प्रा. साक्षी चितारे यांनी मनोगतातून मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘उमंग २०२६’चे अध्यक्ष डॉ. महेंद्र सोनावणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्नेहल कुंभारखाने, क्रीडा प्रमुख प्रा. संदीप माने आदींनी संयोजन केले. सोहळ्याचा तांत्रिक विभाग प्रा. अश्विनी पवार व टीमने समर्थपणे सांभाळला. प्रा. चैताली चव्हाण, प्रा. प्रीती नखोले, प्रा. प्रियांका घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्योती शिंदे यांनी आभार मानले.
गुणवंतांचा सन्मान
यावेळी ‘गोल्डन गर्ल’ पुरस्कार प्रिया कांबळे, ‘स्टुडंट्स ऑफ दी इयर’ पुरस्कार साक्षी खडके यांना तसेच ‘उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार’ आयेशा उरूज आणि रेणू बोम्मिसेट्टी यांना देण्यात आला. विशेष पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट टीचर अवॉर्ड ’ प्रा. शीतल जाधव व प्रा. अतुल भालेराव यांना, तर ‘बेस्ट नॉन टीचिंग स्टाफ अवॉर्ड ’ स्वप्नील सोनावणे यांना प्रदान करण्यात आला.
WKD26A10608
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

