पवना नदीपात्रात प्राण्यांचे मांस, अवयव
हिंजवडी, ता. ६ पवना नदीपात्रात प्राण्यांचे मांस आणि अवयव टाकले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. ‘‘मुंबई-बंगळुरू महामार्गावरील रावेत व पुनावळे दरम्यानच्या पुलावरून अवशेष गाठोडे व कॅरिबॅगमध्ये भरून नदीत टाकले जातात,’’ असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारीनंतर सहायक आरोग्य अधिकारी शांताराम माने, पर्यावरण विभागाचे उपअभियंता पंकज धेंडे, कनिष्ठ अभियंता महेश धावरे, प्रकल्प व्यवस्थापक राहुल वनवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. जालिंदर काटे, ज्ञानदेव काटे, हिरामण गवारे, आकाश रानवडे आदी नागरिक उपस्थित होते. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
नदीपात्रात दररोज मांस
नदी प्रदूषण रोखणे व जलपर्णी हटवण्यासाठी रावेत बंधाऱ्यावर शुभम शिंदे या कंत्राटी सुपरवायझरच्या देखरेखीखाली काही कर्मचारी काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, ‘‘आम्हाला दररोज अशा प्रकाराला सामोरे जावे लागते. नदीपात्रातून दररोज पाच ते सहा गाठोडे बाहेर काढावी लागतात.’’
नदीपात्रात मांस टाकणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही तसेच उपद्रव शोधपथक तैनात केले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे.
- योगेश आल्हाट, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

