कचरा विलगीकरणासाठी वाकड येथे प्रभात फेरी

कचरा विलगीकरणासाठी वाकड येथे प्रभात फेरी

Published on

वाकड, ता. ८ : येथील एसपी इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी चिंचवड महापालिका आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा विलगीकरण प्रभात फेरीद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ओला-सुका कचरा विलगीकरण करू, पिंपरी चिंचवड शहराला देशात नंबर वन करू, ‘प्लॅस्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी’, अशा विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी नगरसेविका श्रुती वाकडकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, अनिता धुमाळ, एसपी इंग्लिश स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष अंकुश बोडके, मुख्याध्यापिका चंदा आतकरी, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, परिसरातील नागरिक, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमात कचरा टाकताना स्वच्छतेचे महत्व महिलांना पटवून देण्यात आले. साळुंके यांनी ओला, सुका, घातक, सॅनिटरी आणि प्लॅस्टिक अशा कचऱ्याचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करून तो स्वतंत्रपणे घंटागाडीत टाकायची सवय लावण्याचे आवाहन केले. डॉ. नंदकुमार धुमाळ, कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com