खिंवसरा पाटील शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्साहात

खिंवसरा पाटील शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Published on

हिंजवडी, ता. ८ : क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील विद्या मंदिर शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनात पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी अनेक प्रयोग व विविध विषयांवरील प्रकल्प सादर केले.
पर्यावरण प्रेमी व सर्पमित्र शुभम पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना निसर्ग समजून घेण्याचे व निसर्ग वाचवण्याचे आवाहन केले. प्रदर्शनात प्रामुख्याने विकसित भारत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ज्वालामुखीचा उद्रेक, पाण्यात द्रव्य - अद्रव्य घटक, वॉटर अलर्ट अलार्म, स्मार्ट व्हिलेज सोलर एनर्जी इत्यादी प्रयोगांचा समावेश होता.
विज्ञान प्रयोग साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक व विज्ञान विषय शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन झाले. स्वाती नांगरे यांनी प्रास्ताविक केले. शुभदा कानडे यांनी सूत्रसंचालन केले. मीना जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com