विद्यार्थीनी, पालक व शिक्षिकांसाठी विविध स्पर्धा
वाकड, ता. ११ : कै. आबाजी रामभाऊ भुमकर कन्या शाळेत महिला दिनानिमित्त महिला पालक, शिक्षिका व विद्यार्थिनी यांच्यासाठी विविध स्पर्धा पार पडल्या.
या वेळी नगरसेविका श्रुती वाकडकर, रेश्मा भुजबळ, मीना भुमकर, मोहन भुमकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी विजेत्या विद्यार्थिनी व पालकांना बक्षिसे देण्यात आली. सर्व महिला शिक्षिका, कर्मचारी यांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थिनींसाठी भाषण व वेशभूषा स्पर्धेत महान व्यक्तिमत्त्वाच्या वेशभूषा साकारल्या. या स्पर्धेत तन्वी सुरवसे प्रथम, तनिष्का निघुत द्वितीय, अनुजा गाडे तृतीय क्रमांक मिळविला.
कार्यक्रमात भारती पावसकर यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी तर श्रुती सुतार यांनी मुलींचे आरोग्य व स्वच्छता याविषयी पालकांना मार्गदर्शन केले. नियोजन मुख्याध्यापिका सुरेखा गोडांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ दिवेकर, नामदेव चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद परबत यांनी केले तर आभार नीलेश अडसूळ यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

