उघड्यावर कचरा टाकण्याचा थेरगावच्या दत्तनगरमध्ये प्रकार

उघड्यावर कचरा टाकण्याचा थेरगावच्या दत्तनगरमध्ये प्रकार
Published on

वाकड, ता. १४ : मागील काही महिन्यांपासून दत्तनगरच्या नागरी वस्तीत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, स्थानिक रहिवासी कमालीचे संतप्त झाले असून कचरा टाकणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी करत आहेत.
दत्तनगरमधून केजुदेवी बोट क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पद्मजी कंपनी गेटजवळ अनेक दिवसांपासून खुलेआम घरगुती कचरा टाकला जात आहे. त्यामध्ये, ओल्या सुक्या कचऱ्याच्या प्लॅस्टिक पिशव्या, शिल्लक अन्न पदार्थ तसेच मद्याच्या बाटल्यांचे प्रमाण अधिक आहे. काही तरुण आणि कामगार लपून-छपून सतत उघड्यावर कचरा टाकण्याचा खोडसाळपणा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रात्रीतून कचऱ्याचे ढिगारे साठतात. त्यामुळे परिसरात दिवसभर घाण पसरत असून नागरी आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, दत्तनगर परिसरात महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाकडून दररोज घरोघरी घंटागाडीमार्फत कचरा संकलन केला जातो. तरीही, हा प्रकार घडत आहे. महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाने याठिकाणी योग्य उपाययोजना करून, पाळत ठेऊन कचरा टाकणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
WKD26A10663

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com