हिंजवडीत सायकलींचे वाटप
हिंजवडी, ता. १२ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहावी ते आठवीत शिकणाऱ्या तसेच दुर्गम व लांब राहणाऱ्या गरजू ६० विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सायकलसोबत हेल्मेट देखील देण्यात आले.
हिंजवडी ग्रामपंचायतीच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम झाला. हिंजवडीचे सरपंच तथा प्रशासक गणेश जांभुळकर, माजी सरपंच सचिन जांभुळकर, विशाल साखरे, विक्रम साखरे, माजी उपसरपंच मनिषा हुलावळे, पल्लवी गंगावणे, सम्राट जांभुळकर, सचिन गंगावणे, कॅनरा रोबेको म्युचुअल फंडचे झोनल हेड गौरव वीरमानी, क्लस्टर हेड कुलदीप थोरगुले आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक बापू येळे यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

