वाकड, थेरगाव, ताथवडे, 
पुनावळेतील नागरिक त्रस्त

वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळेतील नागरिक त्रस्त

Published on

वाकड, ता. १५ : वाकड, थेरगाव, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावठाण, चाळ, सोसायट्या आणि झोपडपट्टी भागात पाण्यासाठी दररोज संघर्ष सुरु असल्याचे चित्र सध्या आहे.
चाळ भागात जुन्या, गंजलेल्या आणि गळती होत असलेल्या वाहिन्या आहेत त्यातच कमी दाबाने दिवसाआड होणारा पुरवठा मोठी डोकेदुखी ठरलेला आहे. थेरगावातील काही भाग आणि ताथवडे परिसरातील झोपडपट्टी भागात परिस्थिती अधिक बिकट असून सकाळी पाणी भरण्यासाठी महिलांची नळकोंडाळ्या भोवती गर्दी होते. अपुरा दाब आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने हांडे रिकामे घेऊन हंड्यांनी परत जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. पाण्याची गरज भागविण्यासाठी टँकरचा आधार घ्यावाच लागत आहे.

आमच्या भागात दिवसाआड पाणी येते, पण दाब खूपच कमी असतो. आमच्याकडे सहाच सदनिका असूनही कशीबशी निम्मी टाकी भरते आणि लगेच दहा मिनिटांत पाणी संपते. बोअरवेलने आम्हाला तारले आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी प्रभावी उपाययोजना कराव्यात दिवसाआड पण, मुबलक पाणी दिल्यास मोठा दिलासा मिळेल.
- कांताबाई साळवे, थेरगाव

आम्ही कर भरतो. इतके वर्ष प्रशासनाने काय केले ? दहा वर्षांपूर्वीच्या दाबाने आम्हाला पाणी हवे होते. आता लोकसंख्या वाढूनही त्यापेक्षा कमी दाबाने पाणी येत आहे. नागरिकांच्या गरजा भागवता येत नसतील तर नवीन परवानग्या का द्याव्यात ? टँकरसाठी वर्षाकाठी कोटी रुपयांहून जास्त रक्कम आम्ही मोजतोय.
- आकाश माने, गायकवाड नगर
---
फोटो
03897

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com