

वाकड, ता. २७ : थेरगाव येथील गणेशनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा विसावा वर्धापनदिन पार पडला. या प्रसंगी ७५ वर्षात पदार्पण केलेल्या व त्यापुढील ज्येष्ठांचा सत्कार झाला. प्रकाश हेरेकर, श्रद्धा खोल्लम, गिरीश भारंबे यांच्या संगीतछायाचे सादरीकरण झाले.
या प्रसंगी अनिकेत प्रभू, नगरसेवक नीलेश बारणे, नगरसेविका शालिनी गुजर, करिष्मा बारणे, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ आदी उपस्थित होते. मृदुला येवलेकर, सिंधु मठपती, कुमुदिनी घोडके, यांच्या गणेश वंदनेणे सभेला सुरुवात झाली. गणेश विपट यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेतला. तात्याबा तोरसे यांनी जमा खर्चाचा लेखाजोखा दिला. संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे यांनी प्रस्तावना केली. नागनाथ तोडकरी, प्रमोद वाळणकर, राजेंद्र परदेशीं, रमेश रासेकर, कृष्णा कळसकर यांचे सहकार्य लाभले. जयश्री श्रीखंडे, सुरेंद्र विसपुते यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव शेकोकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.