

हिंजवडी, ता. २ : मेफेड्रोन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्यांच्याकडून २४२ ग्रॅम मेफेड्रोन पदार्थ आणि मोटार जप्त करण्यात आली.
अतुल बालगुडे (रा. पाथरगाव, मावळ) व त्याचा साथीदार शाहरुख उर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांचे तपास पथक गस्तीवर असताना सहायक फौजदार नरेश बलसाने यांना एक व्यक्ती चारचाकी मोटारीतून विनोदे वस्ती वाकड येथे मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून अतुल याला शिताफीने ताब्यात घेत ४२ ग्रॅम मेफेड्रोन आणि चारचाकी मोटार जप्त केली. तर, अधिक तपास करून त्याचा साथीदार शाहरूखला गोवंडी येथून अटक केली. त्याच्याकडून दोनशे ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.