घरचे वाट पाहताहेत... हेल्मेट घाला सुरक्षित घरी या !

घरचे वाट पाहताहेत... हेल्मेट घाला सुरक्षित घरी या !
Published on

हिंजवडी, ता. ४ : हिंजवडी-माण परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हिंजवडी वाहतूक पोलिसांनी हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनला पत्र देत सर्व आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापराबाबत सक्तीने सूचना कराव्यात, असे आवाहन केले आहे. तसेच जनजागृती करण्याबरोबरच विना हेल्मेट वाहन चालवताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
आयटी पार्कमध्ये दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकीस्वारांचा समावेश असून अनेकजण विना हेल्मेट वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गंभीर आणि जीवघेण्या अपघातांची जणू मालिकाच येथे सुरू आहे. या अपघातांना ब्रेक लावण्यासाठी तसेच निष्पाप जीवांना वाचविण्याच्या दृष्टीने वाहतूक विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली आहे.
हिंजवडी, माणमधील महत्त्वाचे चौक तसेच आयटी कंपनीत जाऊन वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृती अभियान राबविले जात असून त्यास आयटीयन्ससह सर्वांचाच उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

तुमचा जीव अनमोल आहे !
आयटीतील विविध मॉल, शाळा-महाविद्यालये, आयटी कंपन्या, शासकीय व खासगी कार्यालये यासह प्रमुख चौकांत जनजागृती केली जात आहे. ‘हेल्मेट नाही, तर प्रवास नाही’, ‘घरचे वाट पाहताहेत, हेल्मेट घाला सुरक्षित घरी या !’, ‘तुमचा जीव अनमोल आहे, हेल्मेटशिवाय दुचाकी नको !’, ‘घराबाहेर पडताना हेल्मेट घातलेत ना ?’, ‘आपली सुरक्षा कुटुंबाची खुशी’, ‘विना हेल्मेट.. पोलिसांची दंडात्मक कारवाई अटळ’, ‘कायदा पाळा, दंड टाळा, जीव वाचवा’, अशा अनेक आशयाचे फलक झळकले आहेत.


वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यात सार्वजनिक ठिकाणी, चौकांमध्ये फलक लावणे, शाळा-महाविद्यालये, आयटी कंपन्यांत हेल्मेट वापराचे फायदे, सुरक्षा आदी बाबी पटवून देण्यात येत आहेत. या जनजागृती अभियानानंतर कारवाई सत्र सुरू होईल.
- राहुल सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com