मुळशी धरणग्रस्तांचे हिंजवडीत आंदोलन

मुळशी धरणग्रस्तांचे हिंजवडीत आंदोलन
Published on

हिंजवडी, ता. १४ : ‘‘मुळशी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसह तालुक्याला धरणातील पाणी मिळावे,’’ या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून पौड येथे (मुळशी) आंदोलन सुरू आहे. मात्र, ‘‘त्याची दखल घेण्यात आली नाही,’’ असा आरोप करत आयटी परिसरातील ग्रामस्थ, सोसायटी रहिवासी व लोकप्रतिनिधींनी हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी दुपारनंतर रस्ता बंद आंदोलन केले.
आयटी पार्क सुटण्याच्या वेळी हे आंदोलन करण्यात आल्याने काही काळ कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक पूर्ववत केली. या आंदोलनात तिरंगा ध्वज घेऊन आंदोलकांनी पाणी मिळण्यासाठी घोषणाबाजी केली. आंदोलकांनी मनोगतातून तीव्र भावना व्यक्त केल्या. तर, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अमित कंधारे यांची प्रकृती खालावत असल्याचा दावाही आंदोलकांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com