

वाकड, ता. २१ : भूमकरवस्ती येथील महापालिकेच्या आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळेच्या (मुले क्र. १०४) विद्यार्थ्यांनी गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील चार विद्यार्थी पात्र ठरले, तर मंथन स्पर्धा परीक्षा २०२६ मध्ये सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ झाला.
शिष्यवृत्ती परीक्षेत शौर्य उगले याने १९२ गुण मिळवत प्रथम क्रमांक, तर संग्राम कोरडे याने १८८, अजय काकडे याने १७८ आणि हरीश साळवे याने १४२ गुण मिळवून पात्रता मिळविली. विशेष म्हणजे मंथन परीक्षेत संग्राम कोरडे याने तब्बल २०० गुण मिळवत भूमकरवस्ती केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. या परीक्षेत अजय काकडे, शौर्य उगले, गजानन काकडे, प्रज्वल प्रव्हाणे आणि सिद्धांत बनसोडे यांनीही उल्लेखनीय यश मिळविले.
नगरसेवक राहुल कलाटे, श्रुती वाकडकर, कुणाल वाव्हळकर तसेच नगरसदस्य मोहन भूमकर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक अभिजित वैरागर, शिरीन शेख तसेच मुख्याध्यापिका सुनीता पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.