वाकड, पुनावळे, रावेतमध्ये कचरा संकलनाचा बोजवारा

वाकड, पुनावळे, रावेतमध्ये कचरा संकलनाचा बोजवारा
Published on: 

वाकड, ता. २९ ः महापालिकेने वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नवीन क्षेत्रीय कार्यालये सुरू केली आहेत. मात्र, या कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ, वाहने आणि इतर संसाधने उपलब्ध करून दिलेली नाहीत. परिणामी, ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. यावर तत्काळ कार्यवाहीची मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेपासून ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील अर्थात प्रभाग १६, २५ आणि २६ मधील कचरा संकलन सुरळीत होत नाही. अपुऱ्या वाहनांमुळे कचरा संकलन वाहनांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. या भागात वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख, रावेत, किवळे आणि मामुर्डी या गावांचा समावेश असून तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या या भागातील कचरा संकलनासाठी आवश्यक वाहने, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि इतर सुविधा अपुऱ्या पडत आहे. परिणामी, परिसरात कचरा साचणे आणि दुर्गंधी पसरणे यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. ठेकेदारांच्या कामकाजाची नियमित तपासणी करावी, मेकॅनिकल स्वीपिंग यंत्रणेद्वारे स्वच्छता प्रभावीपणे राबवावी आणि कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक कलाटे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.