

हिंजवडी, ता. २९ : माण गावाला मेट्रोच्या नामोल्लेखातून डावलले जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या ३ नोव्हेंबरच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तांत, ब्रॅण्डिंग व प्रसिद्धीमध्ये केवळ ‘हिंजवडी-शिवाजीनगर’ असा उल्लेख होत असल्याने आयटीच्या उभारणीसाठी जमिनी दिल्या, मग मेट्रोच्या नावात माण का नाही ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर या प्रकल्पाचा उल्लेख ‘माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-३’ असा करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारच्या २४ एप्रिल २०२४ च्या राजपत्रातील अधिसूचनेतही ‘पुणे मेट्रो लाईन-३-माण-हिंजवडी-शिवाजीनगर’ असा नामोल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकृत कागदपत्रांमध्ये माणचा समावेश असताना प्रत्यक्ष प्रसिद्धीमध्ये त्याचा उल्लेख टाळला जात आहे. याबाबत पुणे आयटी सीटी रेल लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी यांना प्रतिक्रिया जाण्यासाठी वारंवार फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मेट्रो प्रकल्पाचे नाव माण-हिंजवडी-शिवाजीनगर असेच आहे. पीएमआरडीएच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे ते नाव वापरण्यात येते. मात्र, तिऱ्हाइत संस्था काय म्हणतात; यावर आमचे नियंत्रण नाही. आमच्याकडे ठामपणे माण, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो असेच नाव वापरण्यात येते.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, मेट्रो प्रकल्प, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.