तिकोना किल्ल्यावरील दरवाजाची पर्यटकांकडून मोडतोड 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

पर्यटन बंदीचा आदेश डावलून पर्यटनास आलेल्या काही उपद्रवी पर्यटकांनी रविवारी (ता. 4) तिकोना गडावर नव्याने बसविलेल्या दरवाजाची मोडतोड केली.

वडगाव मावळ (पुणे) : पर्यटन बंदीचा आदेश डावलून पर्यटनास आलेल्या काही उपद्रवी पर्यटकांनी रविवारी (ता. 4) तिकोना गडावर नव्याने बसविलेल्या दरवाजाची मोडतोड केली. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्थेने केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मावळ-मुळशीच्या प्रांताधिकाऱ्यांनी मावळातील गडकिल्ले, लेणी तसेच इतर स्थळांवर पर्यटन बंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशामुळे गेल्या काही वर्षांपासून गडावर सुधारणांची कामे करणाऱ्या दुर्ग संवर्धन संस्थेने तिकोना गडावरील बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावरील दरवाजा बंद केला होता. रविवारी पर्यटन बंदीचा आदेश झुगारून काही पर्यटक गडावर आले होते. त्यातील काही उपद्रवी पर्यटक बालेकिल्ला मार्गातील दरवाजा तोडून गडावर गेले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्‍यातील सह्याद्री प्रतिष्ठानने सुमारे 60 हजार रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी हा दरवाजा बसवला होता. गडावरील गडपाल गुरुदास मोहोळ यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी गड संवर्धन करणाऱ्या संस्थेस त्याची माहिती दिली. पोलिसांनी या उपद्रवी पर्यटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे कार्यकर्ते किरण चिमटे यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists break down the gate of Tikona fort