लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, द्रुतगती मार्गावर बोरघाटातील वाहतूक संथ गतीने

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (ता.२४) बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे घाटातील वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला
tourists Crowd in Lonavala slow traffic in Borghat expressway traffic police
tourists Crowd in Lonavala slow traffic in Borghat expressway traffic policesakal

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (ता.२४) बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे घाटातील वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला आहे. नाताळ व नववर्षानिमीत्त सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. द्रुतगती मार्गावर वाहनांची वाढलेली संख्या व त्यात बोरघाटात सुरु असलेली रस्त्यांची कामे यामुळे वाहनचालकांना शुक्रवार रात्रीपासूनच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला.

पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात पुणे लेनवर बोरघाट पोलीस चौकी दस्तुरी, अमृतांजन पुल ते खंडाळा बोगदा दरम्यान तर मुंबई बाजूकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या. शनिवारी वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खंडाळा आणि लोणावळ्यातही महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीने वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी प्रय़त्न करण्यात येत आहे. वाहतुक सुरळीत करताना बोरघाट (दस्तुरी), खंडाळा टॅपच्या वाहतुक पोलिसांना नाकी-नऊ आले. दरम्यान पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने तसेच विरुद्ध मुंबई बाजूने वळवली.

पर्यटकांमुळे लोणावळा, खंडाळा पर्यटकांनी गजबजला

नाताळला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे आलेल्या पर्यटकांमुळे लोणावळा, खंडाळा पर्यटकांनी फुलून गेला आहे. शहरातील चिक्की दुकानांमध्ये पर्यटकांची वर्दळ होती. कार्ला, भाजे लेणी तसेच आई एकविरेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. राजमाची उद्यान, लायन्स पॉइंट, नारायणी धाम येथे पर्यटकांची पसंती लाभली.

पोलिसांच्या वतीने कारवाईचा इशारा

नाताळ आणि नविन वर्षांच्या निमीत्ताने सुट्ट्यांमुळे पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे बाहेरील पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटनस्थळी जाण्यासाठी नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. अशातच हुल्लडबाजी व अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात येत सामाजिक शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी व सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल, बंगले, कॅम्पिंग, टेन्ट व्यावसायिकांची बैठक घेत त्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या. पर्यटकांना देखील पर्यटनस्थळ येताना व पर्यटनाचा आनंद घेताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे, मद्यपान करुन वाहने चालविणे, मोठ्या आवाजात स्पिकर लावत शांततेचा भंग करणे असे प्रकार करताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहरात व ग्रामीण भागात वाहने तपासणीसाठी चेकपोस्ट लावण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com