पर्यटनास बंदी, तरीही गेले हे महारथी अन् थेट गोळीबारचं

पर्यटनास बंदी, तरीही गेले हे महारथी अन् थेट गोळीबारचं

लोणावळा (पुणे) : पर्यटनास बंदी असताना लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्यांकडून उत्साहाच्या भरात हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. 8) सायंकाळी घडली. पोलिसांनी सागर मोहन भुमकर (वय 35), सचिन बाळासाहेब भूमकर (वय 35, दोघे रा. भूमकर वस्ती, वाकड, ता. मुळशी), संदीप हनुमंत जाधव (वय 36, रा. नेरे, ता. मुळशी), सचिन साहेबराव मांदळे (वय 38, रा. जांबे ता. मुळशी) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार माणिक अहिनवे यांनी फिर्याद दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळ्यात पर्यटनास बंदी आहे. तरीही लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या सागर भूमकर याने येथील लोणावळा धरणाजवळील सहारा पुलावर शनिवारी (ता. 8) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करीत आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून एक राउंड फायर केला. गस्तीवरील पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 80 हजार रुपये किमतीचे भारतीय बनावटीचे रिव्हॉल्व्हर, पाच जिवंत काडतूस व एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी चौघांवर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या जीवितास तसेच व्यक्तिगत सुरक्षा धोक्‍यात आणणारी कृती, शस्त्र परवान्याचा भंग, सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास फौजदार बळिराम सांगळे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com