
पिंपरी : बहुतांश खासगी रुग्णालयांनी वाहनतळाची सुविधा निर्माण केली नसल्यामुळे रुग्ण, नातेवाइकांची गैरसोय होतेच. याशिवाय वाहने अस्ताव्यस्त लावली जात असल्याने परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जाणे भाग पडते. अशा रुग्णालयांवर महापालिका आणि वाहतूक पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.