PCMC Traffic Update : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

Traffic Diversion : पिंपरी-चिंचवडमध्ये १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका आणि लाखोंच्या उपस्थितीमुळे वाहतुकीत बदल करण्यात आले असून हा बदल मिरवणूक संपेपर्यंत लागू असेल.
PCMC Traffic Update
PCMC Traffic UpdateSakal
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणांहून मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये लाखो अनुयायी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येतात आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. या दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच हा उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी पिंपरी, दापोडी, भोसरी, चिंचवड व निगडी परिसरातील वाहतुकीत सोमवारी (ता. १४) बदल करण्यात येणार आहे. हा बदल सोमवारी दुपारी बारापासून मिरवणूक संपेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत असेल. असा असेल बदल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com