VIDEO : होय, हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सुटणार

VIDEO : होय, हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सुटणार

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सुटू शकणार आहे. मात्र, त्यासाठी आयटीयन्सना सहा महिने थांबावे लागणार आहे. बाणेर-म्हाळुंगे- माणमधून आयटी पार्कला जोडणाऱ्या सहा किलोमीटर अंतर रस्त्याचे अर्धे अधिक काम पूर्ण झाले असले, तरी काही काम हे भूसंपादनाअभावी थांबलेले आहे. सध्या या ठिकाणी थांबलेली भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा एमआयडीसीचा प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी आयटीयन्सना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

शिवाजी चौकातला ताण कमी होणार...

नव्याने तयार करण्यात येणाऱ्या या रस्त्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असले, तरी काही ठिकाणी जमीन ताब्यात न आल्यामुळे त्याचे काम रखडले आहे. एमआयडीसीकडून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्त्याच्या जागेतील काही भाग सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीएच्या अखत्यारित येत आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर समन्वय साधून हा प्रश्‍न लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमआयडीसीकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे आयटी पार्कमध्ये वाहनांची वर्दळ कमी झाली असली, तरी लॉकडाउन हळूहळू शिथिल होऊ लागल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये आयटी पार्कमधील वाहतूक पुन्हा सुरू होउ शकते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर सध्या शिवाजी चौकामध्ये येणारा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. सध्या ज्याठिकाणी कच्चा रस्ता आहे. तिथे तात्पुरती व्यवस्था करुन हा रस्ता दुचाकी वाहनांना वापरता येऊ शकेल, अशी व्यवस्था करण्याचे नियोजन एमआयडीसीकडून सुरू आहे. दरम्यान, हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आव्हान आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आयटीयन्स म्हणतात...

बाणेरकडून आयटी पार्कला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. गेल्यावर्षी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा होती. आता मेट्रोचे काम सुरु झाल्यामुळे या पर्यायी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केल्यास शिवाजी चौक, वाकड भागातील रहदारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे आनंद फाटक या अभियंत्याने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com