esakal | Breaking : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प!

बोलून बातमी शोधा

Breaking : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प!

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात नवीन अमृतांजन पुलाजवळ अवजड ट्रेलर आडवा झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

Breaking : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात नवीन अमृतांजन पुलाजवळ अवजड ट्रेलर आडवा झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरघाटात सध्या पाऊस सुरु आहे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा नव्वद टन क्षमतेचा अवजड ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मार्गात आडवा झाला. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील तीनही लेन बंद झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक अडीच तास ठप्प झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

अपघाताची माहीती मिळताच बोरघाट वाहतुक पोलिस, आयआरबी कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. छोट्या वाहनांना जागा करून देत ती रवाना झाली. मात्र, लेन बंद असल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहे. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करीत वाहतूक लोणावळा, खंडाळा मार्गे जुन्या महामार्गाने वळविण्यात आली आहे. अवजड क्षमतेची क्रेन उपलब्ध करत अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमृतांजन पूल पडल्यानंतरही समस्या कायम

बोरघाटातील अपघातांना व वाहतूक कोंडीस निमंत्रण देणारा १९० वर्षे जुना अमृतांजन पूल रस्ते विकास महामंडळाच्या वतीने लॉकडाउनच्या काळात पाडला. मात्र, अपघात घडत असल्याने समस्या कायम आहे. खंडाळा बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान असलेले तीव्र उतार वळण यामुळे वेगावर नियंत्रण राखता येत नाही. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात रस्ता निसरडा होत अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहने हळू चालविण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा