

Accident
sakal
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना चिरडले. यात नऊ वर्षीय बहिणीचा मृत्यू झाला. तर, पोटात जुळी बाळे असलेली गर्भवती बहीण गंभीर जखमी झाली. मंगळवारी (ता. ९) दुपारी तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरात ही दुर्घटना घडली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या.