Wakad News : वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपविले जीवन

महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून संपविले जीवन.
Sahiti Reddy
Sahiti Reddysakal
Updated on

वाकड - ताथवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात एका वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपविल्याचे समोर आले आहे.

सहिती कलुगोटाला रेड्डी (वय २०, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असे तिचे नाव आहे. ती आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय ५४) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव राजेंद्र डोंगरे (वय २०, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सहिती हिच्या आत्महत्येमागील कारण समजू न शकल्याने सुरवातीला पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तिने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉइस मेसेज करून ठेवले होते. तसेच काही रेकॉर्डिंग व पुरावे मित्रांना पाठवत स्वतःचा मोबाईल ठेवल्याचे ठिकाण, त्याचा पासवर्डही सांगितला होता. तिच्या मित्र-मैत्रिणींनी हा सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला.

पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असता, आत्महत्येमागील सत्य समोर आले. त्यामुळे पोलिसांनी डोंगरे याच्यावर सहिती हीस शारीरिक, मानसिक त्रास देऊन, वारंवार शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com