पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिस उपायुक्तांची बदली; 3 सहायक आयुक्तांची नियुक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

परिमंडळ एकच्या उपायुक्त स्मिता पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाणाबाबतचे नवीन आदेश काढण्यात येणार आहेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एक उपायुक्त व एक सहायक आयुक्तांची बदली झाली. तर तीन नवीन सहायक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. याबाबचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी (ता. 9) रात्री उशिरा काढले. 

परिमंडळ एकच्या उपायुक्त स्मिता पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाणाबाबतचे नवीन आदेश काढण्यात येणार आहेत. तसेच वाकड विभागाचे सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांची नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा येथे उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तर नागपूर शहर पोलिस दलातून बदली झालेले गणेश बिरादार, प्रेरणा कट्टे यांची पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तसेच बदली प्रतीक्षाधीन असलेले डॉ. सागर कवडे यांचीही पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer of a Deputy Commissioner of Police from Pimpri Chinchwad