तुंगार्ली धरण परिसरात ट्रकभर बाटल्या गोळा ; नगरपरिषदेने राबवली स्वच्छता मोहीम

Tree has been planted at Lonavla under Swachh Survey and Vasundhara Abhiyan.jpg
Tree has been planted at Lonavla under Swachh Survey and Vasundhara Abhiyan.jpg

लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपरिषदेने तुंगार्ली धरण परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. सुमारे एक ट्रक बाटल्या व तीन ट्रॉल्या कचरा गोळा केला. स्वच्छ सर्वेक्षण व वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन वृक्षारोपण केले.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान सुरू झाले. ओंकार तरुण मंडळ, पत्रकार संघ, मावळ वार्ता फाउंडेशन आदी संस्थांसह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, नगरसेवक राजू बच्चे, निखिल कविश्‍वर, विशाल पाडाळे, ओंकार मंडळाचे अध्यक्ष हरिलाल बोरकर, जयवंत गोसावी, मावळ वार्ता फाउंडेशनचे सदस्य संजय अडसुळे, जितेंद्र कल्याणजी, ज्ञानेश्‍वर येवले, बाबूभाई शेख, संदीप वर्तक आदी सहभागी झाले होते.

अभियानात नगरपरिषदेने सलग तीन वर्षे चांगली कामगिरी करत देशपातळीवर क्रमांक पटकाविला आहे. सध्या केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 व राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानअंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. तुंगार्ली धरण परिसर लोणावळ्यातील पर्यटन स्थळ मानले जाते. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचीही याठिकाणी वर्दळ असते. विविध संस्थांच्या मदतीने नगरपरिषदेने स्वच्छता अभियान राबवले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com