
पिंपरी : सायनलेन्सरमधून मोठा आवाज काढून रॅश ड्रायव्हिंग करीत ट्रीपल सीट दुचाकी सुसाट चालवणारे शहरातील विविध मार्गांवर नजरेस पडतात. अशा बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघाताच्या घटना घडतात. अशा रॅश ड्रायव्हिंगमुळे स्वतःसह इतरांच्याही जिवाला धोका निर्माण होतो.