...म्हणून पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्याच्या गटारात अवजड वाहन अडकून पडल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली.

कामशेत (ता. मावळ) : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्याच्या गटारात अवजड वाहन अडकून पडल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली. सेवा रस्त्याच्या या कामाकडे प्रशासनाचे दूर्लक्ष झाल्याने येथे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शुक्रवारी (ता. ७) पहाटे तीनच्या सुमारास पुणेवरून मुंबईकडे जाणारा ट्रक येथील सेवा रस्त्याच्या गटारात उलटला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. मागील तीन वर्षांपासून येथील उड्डाणपूल आणि सेवा रस्त्याचे काम सुरू आहे. पण हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील गटारे उघडी आहे. या उघड्या गटारात वाहनांचा अपघात होत आहे. दरम्यान, हा ट्रक पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी वाहतूक कोंडी हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck accident on pune-mumbai national highway at kamshet