esakal | पिंपरी-चिंचवड : मगर स्टेडियम येथील जम्बो रुग्णालयात बारा रुग्ण दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड : मगर स्टेडियम येथील जम्बो रुग्णालयात बारा रुग्ण दाखल

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयामध्ये रूग्णांना दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.

पिंपरी-चिंचवड : मगर स्टेडियम येथील जम्बो रुग्णालयात बारा रुग्ण दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयामध्ये रूग्णांना दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. आज मंगळवारी बारा रूग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पिंपरी चिंचवड व पुणे महापालिका, पुणे महानगरविकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या सहकार्याने हे जम्बो रुग्णालय सुविधा उभारण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दृष्टीक्षेपात रुग्णालय

  • रुग्णालयात ८१६ खाटांची स्वतंत्र व्यवस्था
  • ६१६ ऑक्सिजनयुक्त खाटा 
  • २०० आयसीयू खाटांची सुविधा
  • रुग्णालयामध्ये अद्ययावत उपकरणे व सुविधा
  • ३,९०० चौरस मीटर आयसीयू निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित
  • रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ ११हजार ८०० चौरस मीटर 
  • २० हजार चौरस मीटर जमिनीचे विकसन करण्यात आले असून या साठी ४ हजार किलो वॅट विद्युत पुरवठा देण्यात आला आहे.
  • २५ हजार  लिटर क्षमतेचे लिक्वीड ऑक्सिजन मेडिकल टॅंक आहेत.
  • रुग्णालयाचे काम ६ ऑगस्ट २०२० रोजी चालू झाले.

येथील आयसीयू  महाराष्ट्रातील निगेटिव्ह प्रेशर पद्धतीने वातानुकूलित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. हे रुग्णालय उभारण्याचा व ६ महिने चालवण्याचा अंदाजे खर्च ८५ कोटी इतका झाला आहे.  अग्निशमन, पेसो (पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा )इत्यादी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचा खर्च ५० टक्के राज्य शासन व ५० टक्के पुण्यातील स्थानिक शासकीय संस्थांमार्फत करण्यात येईल.

loading image