दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 26 जण बरे; कोणत्या भागातील आहेत पाहा... 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

- एकाच दिवसात २६ जण बरे होऊन पोचले घरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांसाठी आज (शनिवार) दिलासादायक बातमी आहे. आज दिवसभरात २६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. हे सर्व जण संभाजीनगर, आळंदी रोड, आनंदनगर, बौद्धनगर, रुपीनगर, वाकड येथील रहिवासी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात शनिवारी (ता. 30) सायंकाळी सात वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत १९ रुग्ण आढळले. ते आनंदनगर चिंचवड, बौद्धनगर पिंपरी, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरूनगर, दापोडी, चिंचोली, परंदवडी, पाईट  येथील रहिवासी आहेत. शहरातील एकूण रुग्णांची संख्या ५१४ झाली आहे. आजपर्यंत २५० जणांना घरी सोडण्यात आले असून, सध्या २५६ जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत आठ जणांचा मृत्यू झालेला आहे.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत शहराबाहेरील तीन जण आज उपचारासाठी दाखल झाले. त्यात एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. शहराबाहेरील एकूण ४३ जण सध्या उपचार घेत आहेत. १२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty-six people corona free in one day at pimpri chinchwad