
आरोपी सूर्यवंशी व कोलते यांनी 24 सप्टेंबरला दिघी येथील माऊलीनगर व वडमुखवाडी येथील एसबीआय बॅंकेचे दोन एटीएम मशीन बनावट चावीच्या सहाय्याने उघडून त्यातील 66 लाख 10 हजार 100 रूपयांच्या रोकडसह व सीपीयु लंपास केला. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
पिंपरी : दिघीतील एटीएम मशीन फोडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींसह त्यांच्या सहा साथीदारांनी मिळून एटीएम फोडीचे आठ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने चोरलेल्या पैशांतून सोन्याचे दागिने, घर खरेदी करण्यासह लग्नकार्यही उरकल्याचे समोर आले आहे. अखेर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मनोज उत्तम सूर्यवंशी (वय 30, रा. सत्यम इमारत, महाराष्ट्र स्कूलजवळ, पिंपरी वाघेरे), किरण भानुदास कोलते (वय 35, रा. चिखली, दोघेही मूळ राहणार-जळगाव) यांच्यासह महेश आनंद देवणीकर (वय 30, रा. कात्रज, मूळ-लातूर), सागर पोपट तावरे (वय 31, रा. 54 वस्ती, मोरगाव, बारामती), तुषार कुंडलीक चांदगुडे (वय 25, रा. चांदगुडे वस्ती, मोरगाव), शंकर बाळासो गायकवाड (वय 31, रा. माऊडी कडेपठार, पुरंदर), आशिष उर्फ सोन्या बापू भालेराव (वय 22, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड), नरसिंग माधव धुमाळ (रा. बेंडगा, ता. निलंगा, लातूर) अशी आरोपींची नावे आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आरोपी सूर्यवंशी व कोलते यांनी 24 सप्टेंबरला दिघी येथील माऊलीनगर व वडमुखवाडी येथील एसबीआय बॅंकेचे दोन एटीएम मशीन बनावट चावीच्या सहाय्याने उघडून त्यातील 66 लाख 10 हजार 100 रूपयांच्या रोकडसह व सीपीयु लंपास केला. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने सूर्यवंशी व कोलते यांना अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान या आरोपींकडे सखोल तपास केला असता एटीएम फोडीची मोठी टोळी असल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार या दोन आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांसह 2017 मध्ये वाकडमध्ये एटीएम फोडीचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, सूर्यवंशी व देवणीकर हे एटीम मशीनच्या कंपनीत मशीन इंजिनियर म्हणून काम करायचे तर कोलते हा मशीनची देखभाल दुरूस्ती करायचा. त्यामुळे त्यांना मशीनच्या तांत्रिक बाबी माहित होत्या. दरम्यान, एटीएम मशीनमध्ये कॅश भरण्याचे काम करणाऱ्या इतर आरोपींनाही सोबत घेतले होते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या आरोपींना अटक केली असता सूर्यवंशी याने चोरलेल्या पैशातून दहा लाखांचे दागिने खरेदी केले असून ते दागिने निगडीतील मन्नपुरम गोल्ड लोन येथे गहाण ठेवल्याचे समोर आले. त्याच्याकडून पन्नास हजारांची रोकड जप्त केली आहे. तर कोलते याने चोरीच्या पैशांतून म्हाडा गृहनिर्माण संस्थेत घर खरेदी केल्याचे व त्यासाठी बारा लाख रूपये भरल्याचेही उघडकीस आले आहे. यासह कोलते, देवणीकर, तावरे, चांदगुडे, गायकवाड या आरोपींनी सात लाख रूपये शेतीकाम, लग्नकार्य व हॉस्पिटलसाठी खर्च केल्याचे समोर आले. तर आरोपी धुमाळ याच्याकडूनही साडेपाच लाखांची रोकड जप्त केली आहे.
या आरोपींकडून एकूण 72 लाख दहा हजार 100 रूपयांची रोकड, 22 लाखांचे सोन्याचे दागिने, घर खरेदीचे कागदपत्र व तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
या आरोपींकडून तळेगाव दाभाडे ठाण्याच्या हद्दीतील दोन तर वाकड, देहूरोड, निगडी, चाकण, पिंपरी व दिघी ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक एटीएम फोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर बाबर, सहायक निरिक्षक सतीश कांबळे, उपनिरिक्षक गिरीष चामले, कर्मचारी हजरत पठाण, यदु आढारी, सचिन मोरे, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, प्रवीण पाटील, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमते, राहुल सुर्यवंशी, विठ्ठल सानप, महेश भालचिम, प्रमोद ढाकणे, नाथा केकाण, गजानन आगलाबे, नागेश माळी यांच्या पथकाने केली.
अशी होती चोरीची पद्धत
- कॅश रिप्लेसमेंट एजन्सी बदली होताना एटीएम मशीन डिफॉल्ट मोडमध्ये असतानाच लॉकमध्ये छेडछाड करून करायचे चोरी
- एटीएम मशीनचे पिनकोड चोरी करून चोरायचे रोकड
- मशीनमध्ये कॅश भरणाऱ्यांनाच हाताशी धरून करायचे उद्योग
- एटीएमचा डाटा व लॉक तात्काळ उघडू नये यासाठी मशीन बनावट चावीने खोलून त्यातील सीपीयू व मुख्य तिजोरीच्या कुलूपाची करायचे चोरी
- बोगस नंबरप्लेटचा वापर