पिंपरी : कासारसाई धरणात बुडून दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasarsai-Dam

कासारसाई धरणात बुडून अभियांत्रिकीच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ३) दुपारी घडली.

पिंपरी : कासारसाई धरणात बुडून दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

पिंपरी - कासारसाई धरणात (Kasarsai Dam) बुडून (Drown) अभियांत्रिकीच्या दोन तरुणांचा (Engineering Students) मृत्यू (Death) झाला. ही घटना गुरुवारी (ता. ३) दुपारी घडली.

शशांक सिन्हा (वय १९), रवीकुमार सोनी (वय १९, दोघेही रा. आकुर्डी, मूळ - बिहार) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. शशांक, रवीकुमार व इतर चार जण आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते. हे सर्व जण गुरुवारी कासारसाई धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

हेही वाचा: मोशी येथे मानाच्या विड्याची बोली लागली तब्बल 91 लाख रुपयांना

दरम्यान, सर्व जण पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत चौघांना बाहेर काढले. मात्र, शशांक व रवीकुमार हे दोघे बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह पोलिसांनी पाण्याबाहेर काढले. शिरगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two College Students Death In Drown In Kasarasai Dam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top