तळेगाव दाभाडे शहरातील दोन डॉक्टरांना कारावासाची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

तळेगाव दाभाडे शहरातील दोन डॉक्टरांना कारावासाची शिक्षा

तळेगाव दाभाडे - शहरातील दोन डॉक्टरांविरोधात (Doctor) दहा वर्षांपूर्वी दाखल केलेल्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा (Crime) निकाल (Result) नुकताच लागला असून, डॉ. राहुल चंद्रकांत मुळे आणि डॉ. श्रीहरी पांडुरंग डांगे या आरोपींना दोषी ठरवून वडगाव मावळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पल्लवी सूर्यवंशी यांनी तीन महिने साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे. या बाबतची फिर्याद डॉ. गणपती जाधव यांनी दिनांक १० ऑगस्ट २०११ रोजी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. (Two doctors from Talegaon Dabhade were sentenced to life imprisonment)

आरोपी डॉ. मुळे यांच्या दवाखान्याला फिर्यादी जाधव यांनी दिलेल्या भेटीत तपासणीमध्ये (पीसीपीएनडीटी) गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफ फॉर्म भरून घेणे बंधनकारक असताना, अनेक फॉर्म चुकीचे भरणे, अपूर्ण भरणे, संमती न घेतलेले, डॉक्टरांची शिफारस नसलेले फॉर्म भरणे अशा प्रकारची अनियमितता आढळून आली. परिणामी, त्यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २३ अन्वये रूल ९ (४) व रूल ९ (५) चा भंग केला म्हणून न्यायालयात खटला चालू होता. यात सरकारतर्फे सहायक सरकारी वकील एस. एस. परदेशी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Two Doctors From Talegaon Dabhade Were Sentenced To Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top