Kamset-Khandala Accidents : पुणे-मुंबई महामार्गावर दोन अपघातांत दोघांचा मृत्यू

Mumbai-Pune Highway Accidents : मुंबई-पुणे महामार्गावर शुक्रवारी कामशेत आणि खंडाळा येथे दोन वेगवेगळे अपघात झाले. कामशेत येथील अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर खंडाळा येथील अपघातात एकाचा मृत्यू आणि एकजण गंभीर जखमी झाला.
Kamset-Khandala Accidents
Kamset-Khandala Accidents sakal
Updated on

तळेगाव दाभाडे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत व खंडाळा येथे शुक्रवारी (ता. २०) दोन वेगवेगळे अपघात झाले. सकाळी साडेसातच्या सुमारास कामशेत येथे झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. खंडाळा येथे अपघाताची घटना दुपारी तीन वाजता घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com