चिखलीत दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

दोन पिस्तूल व चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई चिखली येथे करण्यात आली. 

पिंपरी - दोन पिस्तूल व चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई चिखली येथे करण्यात आली. 

रणजित बापू चव्हाण (वय 26, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड), दत्तात्रय किसन गाडे (वय 35, रा. मु.पो.येलवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी (ता.8) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी चिखली परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी चव्हाण याच्याकडे 40 हजार 400 रूपये किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे तर गाडे याच्याकडेही देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. दोघांकडून एकूण 80 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two pistol and bullet seized in chikhali crime