
तळेगाव स्टेशन : रस्त्यावरून जाताना बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर कानोसा घेत दोघांनी मटणाच्या दुकानातून रात्रीतून तब्बल ९ बोकड आणि एक गॅस सिलिंडर चोरून नेला. मात्र, चोरलेला बोकड घाईघाईत दुसऱ्याच दिवशी सकाळी वडगाव मावळ येथील बाजारात विकण्यासाठी आणल्यानंतर दोघे चोर अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. रात्रभर आटापिटा करून केलेली बोकडांची चोरी अंगलट आली आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.