'गावावरून कामगार आणतो', असं सांगून त्यानं कंपनीच्या संचालकालाच...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

कंपनीत काम करण्यासाठी गावावरून कामगार आणण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून कंपनीच्या संचालकाला एक लाखाला गंडा घातला. हा प्रकार तळवडे येथे उघडकीस आला. 

पिंपरी : कंपनीत काम करण्यासाठी गावावरून कामगार आणण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून कंपनीच्या संचालकाला एक लाखाला गंडा घातला. हा प्रकार तळवडे येथे उघडकीस आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

योगेश धनवडे व संजय एस. चमेडिया यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अनंत श्रीरंग केंद्रे (रा. संभाजीनगर, कॉलनी, लक्ष्मीनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे तळवडेतील रुपीनगर येथील मधुरे इन्फ्रो इंजिनिअरिंग या कंपनीत ऍडमिन एक्‍झीक्‍युटीव्ह या पदावर कंपनीत कामाला आहेत. दरम्यान, आरोपी योगेश येथे कामाला लागल्यानंतर सुरुवातीला त्याने कंपनीत व्यवस्थित काम करून कंपनीच्या संचालकांचा विश्‍वास संपादन केला. काही दिवसांनी कंपनीचा फायदा करण्याच्या दृष्टीने कंपनीचे संचालक मधुरे यांना 'कंपनीच्या विविध साईटवर काम करण्यासाठी कामगार लागतील, माझ्या ओळखीचे खूप कामगार आहेत. मात्र, त्यांना आणण्यासाठी यवतमाळ येथे जावे लागेल', असे त्यांना सांगितले. त्यास मधुरे यांनी सहमती दर्शविली. 

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 24 जणांचा मृत्यू, तर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हजारावर  

दरम्यान, तीस-चाळीस कामगार आणण्यासाठी ऐंशी हजार रुपये व प्रवास खर्चासाठी वीस हजार ऍडव्हान्स लागतील, असे योगेश याने सांगितले. त्यानुसार कामगारांचे पैसे योगेश याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या नगर येथील बॅंकेत, तर प्रवासाचे पैसे संजय याच्या यवतमाळ येथील बॅंकेत पाठविले. मात्र, बरेच दिवस उलटूनही कामगार न आल्याने मधुरे यांनी वारंवार पाठपुरावा केला असता आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two workers defrauded the company director at talwade