Pimpri Chinchwad Illegal Digital Hoarding
Pimpri Chinchwad Illegal Digital HoardingSakal

Digital Hoarding : पिंपरी शहरात पुन्हा नव्याने अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज उभी राहू लागली

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे तीन हजारांवर होर्डिंग्ज असण्याची शक्यता आहे. होर्डिंग अधिकृत असो की अनधिकृत जर ते व्यवस्थित नियमानुसार बसविले नसेल तर ते जीवघेणे ठरत आहे.
Published on

- जयंत जाधव

पिंपरी - किवळे येथे महिनाभरापूर्वी होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जागे झालेल्या प्रशासनाने कारवाईचा फार्स केला; परंतु आता पुन्हा नव्याने शहरात अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज उभी राहू लागली आहेत.

शहरात सुमारे तीन हजारांवर होर्डिंग्ज असण्याची शक्यता आहे. होर्डिंग अधिकृत असो की अनधिकृत जर ते व्यवस्थित नियमानुसार बसविले नसेल तर ते जीवघेणे ठरत आहे. मागील तीन घटनांमध्ये एकूण सात जणांचा बळी गेल्याने हे सिद्ध झाले आहे.

होर्डिंग्जबाबत महापालिकेचे नसलेले ठोस धोरण व आकाश चिन्ह परवाना विभागात होर्डिंग्ज व्यावसायिकांना व त्या मागील राजकीय नेत्यांच्या समर्थकांना पोसण्याची मनोवृत्ती संपत नाही, तोपर्यंत अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट असाच सुरु राहण्याची अंदाज सर्वसामान्य व्यक्ती करत आहेत.

परवानगी नाकारलेल्या ४३४ होर्डिंग्जना न्यायालयाने काही शर्ती व अटींवर दंड भरून नियमित करण्याचा आदेश न्यायालयाने पाच निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यावर दिला आहे. त्यातील किती जणांनी दंडात्मक शुल्क भरले आहे, हाही संशोधनाचाच भाग आहे. याबाबत आकाश चिन्ह विभागाचे संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

Pimpri Chinchwad Illegal Digital Hoarding
SRA Campaign : ‘एसआरए’ची मोहीम; झोपडीधारकांची सोसायटी स्थापणार

सुमारे पाच टन वजनाचे होर्डिंग चौकात उंचावर उभारलेले असतात. नियमांनुसार जर ते उभारले गेले नाही तर कुठल्याही चौकात मोठा अपघात होण्याची शक्यता दाट आहे. शहरात भोसरीत लांडेवाडीत अर्धवट काढलेले होर्डिंग तसेच ठेवले आहे.

मोशी, रहाटणी, रावेत, चिखली, कोकणे चौक आदी भागातही धोकादायक होर्डिंग्ज आहेत. काळेवाडीत तर; चक्क नदीपात्रातच होर्डिंग्ज उभे केले आहे. या अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जवर महापालिकेने कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Pimpri Chinchwad Illegal Digital Hoarding
PMC Recruitment: पुणे पालिकेच्या शाळेत शिक्षक होण्याची संधी; करार पद्धतीने होणार भरती

होर्डिंगबाबतची नियमावली...

  • होर्डिंगची उंची जास्तीत जास्त ४० फूट पाहिजे

  • आकाशचिन्ह विभागाकडून सर्व मंजुऱ्या आवश्‍यक

  • स्ट्रक्चर स्टॅबिलिटी पाहिजे

  • धोकादायक होर्डिंग उभारल्यास तातडीने कारवाई

  • अनधिकृत होर्डिंगवर दंड आकारणी

महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाचा पदभार दोन दिवसांपूर्वीच घेतला आहे. शहर परिसरातील सर्वच होर्डिंगचा आढावा घेणार आहे. त्याचप्रमाणे अनधिकृत आणि अधिकृत होर्डिंगची माहिती वेब साईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

- सुभाष इंगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com